सोमेश्वर रिपोर्टर टीम------
निरा : विजय लकडे
पुरंदर-हवेली विधानसभेच्या निवडणूकीत तब्बल ४० उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यातील काही बंडखोर देखील आहेत. विद्यमान आमदार संजय जगताप हे महाविकास आघाडी तर त्यांच्या विरोधात महायुतीचे विजय शिवतारे अशीच लढत होण्याची चिन्हे होती. परंतु तालुक्यामध्ये झालेली बंडखोरी व राष्ट्रीय समाज पक्षातर्फे संजय निगडे यांनी फॉर्म भरल्यामुळे चांगलीच रंगत येण्याची चिन्हे आहेत , महाराष्ट्र विधानसभेसाठी राष्ट्रीय समाज पक्षाने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला व २८८ मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी केली.
बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या पुरंदर हवेली या विधानसभेला गुळूंचे येथील उमेदवार संजय निगडे यांना उमेदवारी मिळाली, त्यांनी आपल्या समर्थकांसह पुरंदरच्या विधानसभेसाठी अर्ज दाखल करून निवडणुकीत चांगलीच रंगत आणली आहे.
माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की पुरंदर तालुक्यामध्ये आज पर्यंतच्या इतिहासामध्ये काही आमदार सत्तेत सहभागी झाले तर काही मंत्री देखील झाले तरी देखील पुरंदरच्या पाण्याचा प्रश्न अजून तसाच असून पुरंदर तालुका हा कायम दुष्काळाच्या छायेत वावरत असतो, शेजारून वाहणाऱी निरा नदी चार वेळा दुथडी भरून वाहिली परंतु या नदीवरील वाया जाणारे पाणी घेऊन पुरंदर तालुक्यातील अनेक तलाव भरून तालुका पाणीदार केला असता, परंतु एकाही लोकप्रतिनिधीने याकडे लक्ष दिले नाही, गुंजवणी योजनेची गेली दहा वर्षे पुरंदरची जनता वाट पाहत आहे परंतु अद्यापही कुठलाही पक्ष गुंजवणीची पाणी योजना पूर्ण करू शकला नाही निवडणुकीपुरते गुंजवणीच्या पाण्याचे राजकारण केले जाते.
पुरंदर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली असून येथील युवक पुणे, मुंबई यासारख्या मोठ्या महानगरामध्ये नोकरीसाठी जात आहे बारामती व पुरंदरची तुलना केल्यास शेजारील बारामती तालुक्याच्या तुलनेत पुरंदर हा पूर्णपणे मागास तालुका म्हणूनच ओळखला जातो ही ओळख पुसण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षातर्फे मी प्रस्थापित उमेदवाराविरुद्ध उमेदवारी दाखल केली आहे, ही लढत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशीच असेल असेही त्यांनी बोलताना सांगितले.
-----------Advt------------