सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दीपक जाधव
लोकसभेत सुप्रिया पराभुत झाली असती तर साहेबांचा कमीपणा झाला असता. त्यामुळे लोकसभेला साहेबांचा मान राखला तसा विधानसभेला माझा मान राखा असे भावनीक आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुपे येथे केले.
सुपे ता. बारामती येथे पवार यांचा गावभेट दौरा झाला. यावेळी येथील एसटी बसस्थानक आवारात सभा झाली. त्यावेळी पवार बोलत होते. यावेळी तालुका स्तरावरील तसेच सुपे व परिसरातील मान्यवर उपस्थित होते.
पवार पुढे म्हणाले की, आपआपल्या स्थानिक पुढाऱ्यांबद्दलची नाराजी असेल, तर ती माझ्यावर काढु नका. मला भोगायला लावु नका. उद्याची निवडणुक ही राज्याचे भवितव्य ठरवणारी आहे. राज्यात प्रत्येक पक्षातील मिळुन दहा लिडर आहेत. त्यात माझा समावेश व्हावा यासाठी लाखाच्या फरकाने विजयी करावे असे भावनीक आवाहन पवार यांनी केले.
केंद्रात आपले महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे राज्यात आपली सत्ता आल्यास अनेक विकास कामे मार्गी लागु शकतात. तर लाडकी बहीण योजना पुढे चालु ठेवण्याकरीता महायुतीचे सरकार येणे गरजेचे असल्याचे पवार यांनी सांगितले.
तालुक्यात पाच वर्षात ९ हजार कोटींची विकास कामे झाली. तर सुप्यात दिड कोटींची विकास कामे झाली. सुपे हे गाव नगरपंचायत करण्याच्या दृष्टीने विविध विकास कामे सुरु आहेत. येथे नवीन उपबाजार समितीचे बांधकाम, रुग्णालयाचे काम, तसेच नव्याने ३० बेडचे रुग्णालयाचे बांधकाम आणि पोलिस स्टेशनचे काम तर त्याच्याच वरच्या बाजुला अधिकचे काम सुरु केलेले आहे. येथील सुपे हे नगरपंचायत झाल्यावर जास्तीचा निधी देता येईल. त्यामुळे लवकरात लवकर नगरपंचायत कशी होईल या संदर्भात पहावे लागणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
तसेच जनाई चे ४६१ कोटी खर्चाचे बंद पाईप लाईनच्या कामास मंजुरी मिळाली आहे. पिण्याच्या पाण्याची योजना राबवली जात आहे. तसेच सुपा ते भिगवण हा सिमेंट रस्ता ३५० कोटी तर सुपा ते लोणीपाटी मार्गे सांगवी रस्ता २५० कोटी खर्चाचा दहा मिटर रुंदी करणाचा होणार आहेत. येथील एसटी बसथानकाला नवीन जागा द्या त्याठिकाणी पुढील ३० वर्षाचे भवितव्या ठरवुन बांधकाम करु असे पवार यांनी सांगितले.
.....................................