बारामती विधानसभा l शरद पवार यांच्या उद्या बारामती तालुक्यात चार सभा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) जेष्ठ नेते शरद पवार यांच्या उद्या दि. ५ रोजी बारामती विधानसभेचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ चार सभा होणार आहेत. तसेच सायंकाळी ५ वाजता बारामती येथे डॉक्टर, वकील व व्यापारी संघटनांचा मेळावा आयोजित केला आहे. 
          सकाळी ९ वाजता बारामती तालुक्यातील शिर्सुफळ, ११ वाजता सुपा, १२ वाजता मोरगाव तर दुपारी ३ वाजता सोमेश्वरनगर येथे या सभांचे आयोजन करण्यात आले आहे. सभेला खासदार सुप्रिया सुळे, उमेदवार युगेंद्र पवार तसेच पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
To Top