जावली l धनंजय गोरे l रासपचे नेते विलास शिंदे यांचा तडकाफडकी राजीनामा : जिल्ह्यात रासपला मोठा धक्का, राष्ट्रवादी शरद पवार गटात जाण्याच्या चर्चांना उधाण

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टिम--------
जावली : धनंजय गोरे
 राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. ऐन निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे युवकचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष विलास शिंदे यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा व आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.
        शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपला निर्णय जाहीर केला आहे. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान रासपमधील अंतर्गत धुसफुस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. शिंदे यांच्या राजीनामा नाट्याने साताऱ्यात रासपला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे रासप नेते विलास शिंदे हे जिल्ह्यात सध्याच्या घडीला रासपचे हेवीवेट नेते होते. पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांचा विश्वासू चेहरा म्हणून शिंदे यांच्याकडे पाहिलं जातं. पण त्यांच्याच जिल्ह्यात शिंदे यांच्या राजीनामा नाट्याने पक्षातील अंतर्गत धुसफूस समोर आली आहे. आता या राजकीय घडामोडींवर महादेव जानकर काय प्रतिक्रिया देतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
       विलास शिंदे हे गेल्या अनेक दिवसांपासून पक्षातील कामकाजावर प्रचंड नाराज होते. याच नाराजीतून शिंदे यांनी रासपला सोडचिठ्ठी दिल्याचे सांगितले जात आहे. प्रचंड दांडगा जनसंपर्क, अत्यंत सुस्वभावी व्यक्तिमत्व, खेडोपाड्यातील जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणारे व्यक्तिमत्व म्हणून शिंदे यांच्याकड पाहिलं जातं. शिंदे यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून युवकांचे जिल्हाभर मोठे संघटन उभारले असून विविध समाजाच्या लोकांना बरोबर घेऊन काम करण्याच्या पद्धतीमुळे जिल्हाभरात दांडगा जनसंपर्क तयार केला आहे.
          विलास शिंदे यांची रासपचे महाराष्ट्र युवकचे प्रदेशाध्यक्ष अजित पाटील व पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रकाश खरात यांचे कट्टर समर्थक अशी ओळख आहे. असं असताना त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. शिंदे यांनी रासपला सोडचिठ्ठी दिल्यामुळे आता महाराष्ट्रातील रासपचे ज्येष्ठ नेते काय भूमिका घेतात, शिंदे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जातो का? हे पाहणं महत्त्वाचं आहे. ऐन निवडणुकीत शिंदे यांनी राजीनाम्याचा पवित्रा घेतल्याने रासपला मोठा फटका बसणार आहे. या सगळ्या घडामोडींदरम्यान शिंदे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
        विलास शिंदे यांनी राजीनामा नेमका का दिला?
विलास शिंदे यांनी राजीनामा का दिला? असा प्रश्न उपस्थित होतोय. त्यावर त्यांनी पक्षातील अंतर्गत नाराजी याशिवाय पक्षात काम करत असताना अडचणी येत असल्याचं सांगितलं आहे. मात्र आता त्यावर पक्षाचे वरिष्ठ नेते काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
To Top