सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : दीपक जाधव
राज्याच्या राजकारणात ३० वर्ष तर केंद्रात ३० वर्ष काम केले. आता राज्यसभेची दिड वर्ष राहिलेली आहेत. त्यामुळे यापुढे कुठलीही निवडणुक लढवणार नाही मात्र वंचित घटकांसाठी काम करीत राहणार असल्याचे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी राजकारणातुन निवृत्तीचे संकेत दिले.
सुपे येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा उमेदवार युगेद्र पवार यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत पवार बोलत होते. यावेळी काटेवाडीचे पांडुरंग शेलार, दंडवाडीचे माजी सरपंच जालिंदर चांदगुडे, भोंडवेवाडीचे माजी उपसरपंच कालिदास भोंडवे, बोरकरवाडीचे माजी सदस्य रमेश बोरकर आदींनी शरद पवार पक्षात प्रवेश केला. पवार पुढे म्हणाले की, आतापर्यंत १४ निवडणुका लढवल्या. तुम्ही असे लोक आहात की दरवेळी निवडुन देताय, एकदाही मला घरी पाठवलं नाही. म्हणुन कुठतरी थांबल पाहिजे. मी १९६७ साली निवडणूक लढविली. तेव्हा तीस वर्ष माझ्याकडे नेतृत्व आले. त्यानंतर पुढील तीस वर्षे अजितदादांकडे नेतृत्व सोपवले, पण आता पुढच्या ३० वर्षाची व्यवस्था करायची आवश्यकता आहे. त्यामुळे नवीन नेतृत्वाला संधी देणे आवश्यक आहे. तरच लोकांच्यामध्ये जाऊन लोकांचे प्रश्न सुटणार आहेत. त्या दृष्टीने आजची निवडणुक महत्वाची आहे.
पंतप्रधानाने देशाचा तर मुख्यमंत्र्याने राज्याचा विकास करायचा असतो. महाराष्ट्रावर बेरोजगारीचे संकट घोंगाळत आहे. मात्र सद्याचे पंतप्रधान हे महाराष्ट्रातील सर्व कंपन्या गुजरात कडे घेवुन चालले आहेत. पंतप्रधान हा देशाचा असतो तो एका राज्याचा नसतो हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे राज्याचा चेहरा बदलण्याकरीता महाविकास आघाडीला निवडुन द्या. त्यासाठी नवीन पिढीकडे नेतृत्व गेले पाहिजे. आज राज्य ज्यांच्या ताब्यात आहे, ते व्यवस्थित राज्य चालवत नाहीत. म्हणून महाराष्ट्रात नव्या नेतृत्वाची फळी उभा करण्याचा संकल्प आम्ही लोकांनी केला आहे. त्याला तुम्हा लोकांची साथ पाहिजे असे पवार यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी कुटुंबातील एकाने शेती तर दुसऱ्याने व्यावसाय केला पाहिजे. महिलांना ५० टक्के आरक्षण दिल्याने देशाच्या विविध ठिकाणी महिला चांगल्या प्रकारे काम करीत असल्याचे दिसुन येत आहे. महिलांना कर्तृत्वाची संधी दिल्यानंतर पुरुषांइतकं त्याही बरोबरीने काम करतात हे आपल्याला बघायला मिळत असल्याचे पवार यांनी सांगितले.
याप्रसंगी माजी आमदार विजयराव मोरे, माजी आमदार लक्ष्मण माने, आजी जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, उमेदवार युगेंद्र पवार, सदाशिव सातव, सतिश खोमणे, पोपट पानसरे, भारती शेवाळे आदींसह शेत्करीवर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक हनुमंत चांदगुडे यांनी केले. ...........................