सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
लाडकी बहीण योजनेमुळे महिलांमध्ये आर्थिक सबळाता आली आहे. महिलांना आर्थिक दृष्ट्या आणखी सबळ करण्यासाठी महायुतीला साथ द्या असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुळशी येथे भोर विधानसभेचे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शंकर मांडेकर यांच्या प्रचार शुभारंभप्रसंगी मंगळवार दि.५ रोजी केले. रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शंकर मांडेकर,माजी आमदार शरद ढमाले, माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुळशी तालुका अध्यक्ष अंकुश मोरे, कालिदास गोपलघरे ,चंद्रकांत भिंगारे, अमित कंधारे, राजाभाऊ हगवणे ,राजाभाऊ वाघ, धैर्यशील ढमाले, श्रीकांत कदम, विनोद कंधारे, विजय कानगुडे, विजय यनपुरे, चंद्रकांत भिंगारे, बाळासाहेब सणस, अशोक कांबळ माऊली कांबळे, आकाश वाघ, प्रकाश वाघ, दिनेश कंधारे, सुनिल कदम, संतोष कंधारे, विजय कानगुडे, सचिन अमराळे, राजेंद्र बांदल, आनंद घोगरे, लव्हु चव्हाण, दशरथ महाराज मानकर आदी उपस्थित होते.
रुपाली चाकणकर पुढे म्हणाल्या जे पंधरा वर्ष या भागाचे नेतृत्व करत आहेत त्यांना या भागाचा विकास नाही साधे रस्तेही करता आलेले नाहीत.महायुती सरकारने शेकडो लोककल्याणकारी योजना आणल्या आहेत.विरोधक या योजना बंद करण्यासाठी कोर्टात धाव घेत आहेत.पण लोककल्याणकारी योजना बंद होणार नाही.त्यासाठी तुमच्या भावाला मतदान करा असे आवाहन केले.
शंकर मांडेकर म्हणाले की तालुक्याचे नेतृत्व करायला वाघाचं काळीज लागत.माझं नाणं खणखणीत आहे. आपण सर्वांनी मला नेतृत्व करण्याची संधी द्यावी. आमदार गेली पाच वर्ष मतदार संघात आले नाहीत अशी टीका मांडेकर यांनी संग्राम थोपटे यांच्यावर केली.विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य तो दर मिळाला पाहिजे. मी सर्व सामान्य कार्यकर्त्याकडे कधीच दुर्लक्ष केलं नाही. त्यांच्यासाठी मी हजर असतो. तुम्ही संधी द्या, मी सोनं करतो.