पुरंदर l निधन वार्ता l वाल्हे येथील हनुमंतराव पवार यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : प्रतिनिधी 
पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हनुमंतराव पवार वय ५२ यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले. 
        राष्ट्रवादी शरद पवार गट नीरा कोळ विहीर  गणाचे ते अध्यक्ष होते, वाल्हे गावच्या ग्रामपंचायत सदस्यांची धुरा देखील त्यांनी पाच वर्षे सांभाळली होती. पुरंदर तालुक्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचा नेहमी वावर असे, तालुक्यामध्ये त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे, त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक भाऊ व वडील आहेत. त्यांच्या निधनाने वाल्हे गावासह संपूर्ण तालुक्यावर देखील शोककळा पसरली आहे.
To Top