Baramati News l बारामती तालुक्यात ८५ वर्षावरील वयोवृद्ध व दिव्यांगांनी बजावला मतदानाचा अधिकार : निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे करंजेपुलच्या लक्ष्मण गायकवाड यांनी २३ वर्षानंतर बजावला मतदानाचा हक्क

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
निवडणुक आयोगाने १५ ऑक्टोबर २०२४ रोजी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले असुन महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदार संघासाठी निवडणुक दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी घेतली जाणार आहे. ८५ वय असलेले मतदार व दिव्यांग मतदारांना मा. निवडणुक आयोगाचे सुचनेनुसार घरातुन मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली गेली. यामुळे अनेक वयोवृध्द व दिव्यांग मतदारांनी दोन तपानंतर आपला मतदानाचा हक्क बाजवला. बारामती तालुक्यातील करंजेपुल येथील लक्ष्मण जगन्नाथ गायकवाड यांनी तब्बल २३ वर्षानंतर आपला मतदानाचा हक्क बाजवला. 
       विधानसभा मतदार संघातील ८५ वय असलेले मतदार व दिव्यांग मतदारांना निवडणुक आयोगाचे सुचनेनुसार घरातुन मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली गेली. घरातुन मतदान करणाऱ्या मतदारांसाठी मतदान करुन घेणेसाठी पथकांची नियुक्ती केली असुन त्याचा कम्युनिकेशन प्लॅन तयार केला आहे. कम्युनिकेशन प्लॅन नुसार झोनल अधिकारी, मतदान अधिकारी, सुक्ष्म निरीक्षक, व्हिडीओ ग्राफर, पोलीस व शिपाई यांची नियुक्ती केली आहे. सदर नियुक्त केलेल्या अधिकारी/कर्मचारी यांनी कम्युनिकेशन प्लॅनमध्ये नमुद केलेप्रमाणे ८५+ वय असलेले मतदार व दिव्यांग मतदारांना निवडणुक आयोगाचे सुचनेनुसार घरातुन मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन देणेची आहे. तसेच मतदानासाठी केलेल्या पथकांमध्ये (कम्युनिकेशन प्लॅननुसार) मतदान अधिकारी म्हणुन मंडळ अधिकरी यांची नेमणुक केली आहे.
To Top