सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वेल्हे : मिनल कांबळे
राजगड तालुक्यांतील विंझर येथे एका घरात ३८ बॉक्स देशी दारूचे सापडले आहेत. अशी महिती वेल्हे पोलिसांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की राजगड तालुक्यांतील विंझर येथे एका घरात देशी दारूचे ३८ बॉक्स सापडले. ३८ बॉक्स प्रत्येकी बॉक्समध्ये एकूण ४८ दारूच्या १८० मिली च्या बाटल्या प्रत्येकी बाटलीची किंमत ७० रुपये प्रमाणे एकूण १ लाख २७ हजार ६८० किमतीची दारू पोलिसांनी जप्त केली आहे. याबाबात विंझर येथील दिपक दिनकर गायकवाड वय ४३ वर्ष रा- विंझर ता- वेल्हा जि- पुणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून फिर्याद अजिंक्य शंकर बंडगर वेल्हे पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित देशमुख पोलीस हवालदार ज्ञानदीप धिवार पोलीस कॉन्स्टेबल अजिंक्य बंडगर अजय गार्डी यांनी केली आहे.