Baramati News l मेंढ्यांच्या काळपावर लांडग्यांच्या हल्ला : अकरा बकऱ्यांचा मृत्यू

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी   
करंजेपुल ता. बारामती येथील गायकवाड वस्तीवरील साळु यदु मोटे या मेंढपाळाच्या मेंढ्यांच्या वाडग्यावर दि. ९ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास लांडग्यांनी  हल्ला करून चार कोकरी पळवली आहेत. तर सात बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात एकूण ११ बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. 
         नेहमीप्रमाणे दिवसभर रानावनात आपली बकरी चारून आणल्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास आपली बकरी करंजेपुल येथील वाडग्यामध्ये कोंडली होती, या वाडग्याला दगडी रचून वाघर लावून त्याचे कंपाऊंड केलेले असते यामध्ये बकरी सुरक्षित असतात परंतु मध्यरात्रीच्या सुमारास हिंस्र प्राण्यांच्या कळपाने हल्ला करून मेंढ्यांच्या कळपाला लावलेली वाघर तोडली व यातील चार लहान कोकरी पळवली आहेत तर सात बकरी मृत्यू पावले आहेत चार जखमी आहे, या हल्ल्यामुळे या मेंढपाळाचे आर्थिक नुकसान झाले आहे. पंचनामा करून मदत मिळावी अशी अपेक्षा या मेंढपाळाने व्यक्त केली आहे.
To Top