सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : विजय लकडे
पुरंदर तालुक्यातील पुणे पंढरपूर महामार्गावर वाल्हे येथे दोन मोटरसायकलचा अपघात होऊन यामध्ये चार जण जखमी झालेत.
पुरंदर तालुक्यातील पुणे पंढरपूर महामार्गावर वाल्हे येथे दोन मोटरसायकलचा अपघात होऊन यामध्ये चार जण जखमी झालेत. यामध्ये एक जण गंभीर रित्या जखमी झालाय. पुण्याकडून निराकडे निघालेल्या या दोन मोटरसायकल वाल्हे येथे एकमेकांना धडकल्या. वाल्हे येथील महर्षी वाल्मिकी विद्यालयाच्या समोर सध्या महामार्गाचे काम चालू आहे. त्या ठिकाणी असलेल्या खड्ड्यांमध्ये मोटरसायकल गेल्याने पुढच्या मोटरसायकल चालकाने ब्रेक दाबला. त्याच वेळी पाठीमागून वेगात आलेली मोटरसायकल त्याला जोरात धडकली. यामध्ये दशरथ महादेव मासाळ वय ५५,आदित्य दशरथ मासाळ, वय २०, सुप्रिया दादा शेळके वय १८ हे जखमी झाले. तर दादा सुरेश शेळके वय ६० चौघेही राहणार पुणे (खराडी) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना वाल्हे येथील पोलिसांनी तातडीने जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारसाठी पाठवण्यात आले.