सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
नवी मुंबई : गणेश धनावडे
कोपरखैरणे रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.
नवी मुंबई मधील वर्दळ असलेले ठिकाण कोपखैरणे मध्ये स्टेशन परिसरात १.३० च्या सुमारास रिक्षाला अचानक आग लागल्यामुळे रिक्षा खाक झाली, सदर परिसरामध्ये चक्का जाम झाला होता. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही , सदर आग आटोक्यात आण्यासाठी साठी फायर ब्रिगेडच्या गाडीने आग आटोक्यात आणण्यात आली. सदर घटना कोपखैरणे रहिवासी अमोल जांभळे यांनी पत्रकार प्रतिनिधींना प्राथमिक माहीत देण्यात आली तरी सदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसून लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहीत मिळाली आहे.