Breaking News l विषबाधेने नऊ बकऱ्यांचा मृत्यु : बारामती तालुक्यातील सुपे परिसरातील घटना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : दीपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे येथे विषबाधा झाल्याने सुमारे नऊ बकऱ्यांचा मृत्यु झाल्याची घटना शनिवारी ( दि. ०९ ) दुपारी घडली. 
        त्यामुळे शासनाकडुन या बकऱ्यांची नुकसान भरपाई त्वरीत मिळण्याची मागणी मेंढपाळाने केली आहे. संपत नाथु शेंडगे असे बकरी मेलेल्या मेंढपाळाचे नाव आहे. शेंडगे यांच्याकडुन मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सुपे तलावाच्या खालच्या बाजुला बकरी चरत होती. या ठिकाणच्या एका शेतकऱ्याच्या शेतातील मक्याचे पिक बकऱ्यांनी खाल्ले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी अचानक एका मागोमाग एक सुमारे नऊ बकऱ्यांचा मृत्यु झाला.  
          या मेंढपाळावर अचानक संकट आल्याने शासनाच्यावतीने त्वरीत नुकसान भरपाई मिळण्याची मागणी परिसरातील मेंढपाळांनी केली आहे. यावेळी सुपे येथील सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. आर. डी. बालगुडे यांनी घटनास्थळी येवुन भेट दिली. यावेळी बालगुडे म्हणाले की, काल मेंढ्यांच्या खाण्यात जास्त प्रमाणात मका आली होती. त्या मकेला बुरशीचे प्रमाण असल्यामुळे बकऱ्यांना विषबाधा झाल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे विषबाधेने बकऱ्यांचा मृत्यु झाल्याचा अंदाज आहे. अन्य काही बकऱ्यांना औषध देवुन उपचार केल्याचे बालगुडे यांनी सागितले. 
        ........................................
Tags
To Top