सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : प्रशांत ढावरे
अंदोरी ता. खंडाळा येथील काचंनवस्ती परिसरात अंदोरी -रुई रोडने जाणाऱ्या एकास बिबट्या दिसला आहे. तसेच अंदोरी-बावकलवाडी रोडवर असणाऱ्या कानिफनाथ मंदीर नजीक रोडने निघालेल्या दुध गाडी समोरुन बिबट्या आडवा गेलेला आहे.बिबट्याने शेतकऱ्याच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला करुन त्यांना ठार केले आहे, तसेच दोन शेतकऱ्याच्या गाईवर हल्ला करुन त्यांना ठार केले असुन एका शेतकऱ्याची शेळी देखील ठार करुन परिसरात धुमाकुळ घातला आहे,अंदोरी परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने व शेतकऱ्याच्या पाळीव जनावरावर तो हल्ला करुन ठार करत असल्याने अंदोरी परिसरातील ग्रामस्थामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अंदोरी येथील
काचंनवस्ती परिसरात अंदोरी -रुई रोडने जाणाऱ्या गणेश सागर यास बिबट्याचे दर्शन झाले आहे. यानंतर वनविभागाने घटनास्थळी भेट देऊन बिबटयाच्या ठश्याची पाहणी केली आहे, त्यानंतर गुरुवारी रात्री अंदोरी येथील खोरी नावाच्या शिवारात बाळु धायगुडे यांच्या शेळीवर बिबटयाने हल्ला करुन शेळी ठार केली आहे, त्याच दिवशी बिबट्याने शिवाजी धायगुडे यांच्या गाईच्या वासरावर हल्ला करून त्यास ठार केले आहे. शुक्रवारी रात्री अंदोरी-बावकलवाडी रोडवर असणाऱ्या कानिफनाथ मंदीर नजीक रोडने निघालेल्या कृष्णा यादव यांच्या दुध गाडी समोरुन बिबट्या आडवा गेलेला आहे.याच दिवशी हाडंबरमळा परिसरात रात्रीच्या सुमारास दिलीप हाडंबर यांच्या गाईवर बिबट्याने हल्ला करुन गाईला ठार केले आहे. अंदोरी परिसरातील अनेक पाळीव कुत्र्यावर देखील बिबटयाने हल्ला करुन त्यांना ठार केले आहे, बिबटयाच्या दर्शनामुळे व तो पाळीव प्राण्यावर हल्ला करत असल्याने परिसरातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.