Purandar Breaking l ऑनलाइन कर्ज ॲपच्या माध्यमातून ४ लाख ८१ हजारांची फसवणूक : नीरेच्या बंटी-बबलीवर जेजुरी पोलिसात गुन्हा दाखल, भाऊ पोलिसांच्या ताब्यात तर बहिण फरार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : प्रतिनिधी
नीरा (ता.पुरंदर) येथे ऑनलाइन कर्ज ॲपच्या माध्यमातून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात जेजुरी पोलिसात दोघा बहिण भावा विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी भावाला ताब्यात घेतले आहे. त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती जेजुरी पोलिसांनी दिली आहे. तर मुख्य महिला आरोपी  फरार झाली आहे. 
          याबाबत रामचंद्र मारूती गायकवाड (वय ४२) यांनी जेजुरी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नीरा येथे राहणारे अस्लम उर्फ गोंडया सयद मुलाणी व यास्मीन भालदार दोघे  रा. शिवतक्रावाडी नीरा (ता. पुरंदर) या दोघा भाऊ बहिणीने मिळून रामचंद्र गायकवाड व अन्य चार चार जणांची ऑन लाईन कर्ज ॲपद्वारे  कर्ज काढून त्यांच्या कर्जाचे पैसे परस्पर दुसऱ्या खात्यावर वर्ग केले आणि त्यांची फसवणूक केली याबाबत फिर्याद दिली आहे. यामध्ये त्यांची एकूण २ लाख २ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. यातील काही रक्कम त्यांनी स्वतःच्या खात्यावर वर्ग केली. १ लाख ४० हजार रुपये यास्मीन भालदार यांनी त्याच्या स्वतःचे अकांउट  पाठविली व राहीलेली काही रक्कम ऋषिकेश पोरे रा. नीरा ता. पुरंदर जि.पुणे व किसान बोरवेल सातारा यांच्या बँक खात्यावर पाठवली. यानंतर यातील कोणतीही रक्कम त्यांना देण्यात आली नाही. याउलट मी रक्कम मागितल्यास किंवा कुठे तक्रार केल्या विनयभंगाची तक्रार पोलिसात दाखल करण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे या महिले विरोधात तक्रार करण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते. 
      यास्मिन हिने गायकवाड यांचा मोबाईल कर्ज ॲप डाऊनलोड केले आणि त्यावरून कर्ज उचलले यामध्ये १) पुनावाला फाईन काँप लिमीटेड मधुन १,४४,००० रू, २) पे युथ फायनान्स इंडीया प्रा.लि मधुन १६,००० रू, ३) युनोफॉन सोलुशन प्रा.लि १५०००-०० रू, ४) फीनकर्व फायनान्स स.ली. मधुन ५००० रू, ५) आर. के बन्सल प्रा. वेळलो. मधुन ४,००० रू, ६) वैभव वायपर प्रा.ली. मधुन २,०००/- रू, ७) फझीवी प्रा.ली. मधुन ४,०००रू, ८) ट्रान्ससिटी टेक्नॉलॉजी प्रा.ली मधुन १२,५०० असे एकुण २ लाख २५ हजार कर्ज घेतले आणि त्यानंतर त्यांच्या मोबाईल मधून ही सर्व ॲप अनइंस्टॉल केली. 
         त्याच बरोबर नीरा आणि परिसरातील गणेश पडघमकर यांस १,००,००० रू, नितीन निगडे रा.गुळुंचे ता. पुरंदर यास ६५,००० रू, युवराज रामा चव्हाण रा.जेउर यास ६२,४०० रूपयास,  दत्तात्रय काशीनाथ माने रा. वाणेवाडी ता. बारामती जि.पुणे यास ३५,००० रू, अविनाश बाबासो गायकवाड रा करंजे ता. बारामती जि.पुणे यास १६,५०० रूपयास असे यांना वेळावेळी आत्ता पर्यन्त एकुण ४ लाख ८१ हजार ४०० रूपयेची फिर्याद  व त्यांच्या गावातील लोकांचे मोबाईलवरून लोन ॲप डाउनलोड करून, त्यावरून लोन करून लोनची वरील रक्कम स्वःतचे खात्यावर घेवुन आमची फसवणुक केली असल्याची फिर्याद देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अस्लम उर्फ गोंडया सयद मुलाणी याला ताब्यात घेतले आहे. तर, यास्मीन भालदार फरार झाली असून जेजुरी पोलीस तिचा शोध घेत आहेत.
Tags
To Top