Bhor News l भोरला कायदा सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा रूट मार्च

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्यात येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी भोर पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च काढून शहरातून संचलन करण्यात आले.
      २०३ विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे.या अनुषंगाने राज्यांमध्ये आदर्श अशी आचारसंहिता लागू झाली आहे.२० नोव्हेंबर रोजी होणारे विधानसभेची निवडणूक शांततामय व निर्भय वातावरणामध्ये व्हावी मतदार राजांनी कोणत्याही धमक्या भितीमुळे वातावरणात तसेच कोणते अफवांना बळी न पडता निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा यासाठी भोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तर उपनिरीक्षक अनिल चव्हाण,अशोक खुटवड,दीप्ती करपे,पोलीस हवालदार अभय बर्गे ,विकास लगस, विजयकुमार नवले ,सुनील चव्हाण, हेमंत भिलारे,यशवंत शिंदे तसेच हरियाणा राज्य राखीव पोलीस दलातील २७ जवान व तीन अधिकारी यांच्या उपस्थितीत रूट मार्च काढण्यात आला. 
To Top