सोमेश्वर रिपोर्टर टीम------
शिरवळ : प्रतिनिधी
खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या एम.ई.एस.इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये बुधवार दि.27 ते शुक्रवार दि.29 नोव्हेंबर रोजी तीन दिवसीय रंगवेध चिञकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उपाध्यक्ष आनंदीताई पाटील, कलावर्धिनी अध्यक्ष डाँ.दिलीप शेठ यांनी दिली.
या प्रदर्शनाचे उदघाटन शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सेवानिवृत्त एअर मार्शल भूषण गोखले हे आहे.यावेळी व्यंगचिञकार चारुहास पंडित यांच्या हस्ते समारोप व बक्षिस वितरण होणार आहे.याप्रसंगी उपाध्यक्ष आनंदीताई पाटील,नियामक मंडळ अध्यक्ष बाबासाहेब शिंदे,उपाध्यक्ष प्रदिप नाईक हे उपस्थित राहणार आहे.यावेळी शुक्रवार दि.29 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत शिरवळ व परिसरातील व पालकांकरीता चिञकला प्रदर्शन खुले राहणार आहे,तरी या प्रदर्शनाचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन प्राचार्या स्वाती जोशी यांनी केले आहे.