सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान आयोजित पाली मराठी भाषेचे शब्दकोशाकार लोकशिक्षक बाबा भारती यांच्या जन्मशताब्दी निमित्त वार्षिक शब्द उत्सव सातवा उपक्रम जीवनगौरव व पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यावर्षीचा राज्यस्तरीय लोकशिक्षक बाबा भारती काव्य प्रतिभा पुरस्कार निवेदक ,लेखक, पत्रकार, अभिनेते ,गीतकार ,व्याख्याते, समीक्षक, रानकवी जगदीप वनशिव यांना जाहीर करण्यात आला आहे.
दौंड तालुक्यातील सालू मालू पारगावचे कवीभूषण हरहुन्नरी .अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारेअशी माहिती लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष निमंत्रक महेंद्र भारती व मुख्य संयोजक पुरुषोत्तम सदाफुले यांनी निवडपत्र दिले आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे ज्येष्ठ समाजसेवक तसेच ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक डॉ श्रीपाल सबनीस यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. प्रमुख पाहुणे कृषी भूषण सुदाम भोरे ,विमलताई ठाणगे ,सरपंच हिवरे बाजार आदर्श गावाचे जनक पद्मश्री पोपटराव पवार कार्याध्यक्ष आदर्श गाव संकल्प आणि प्रकल्प महाराष्ट्र राज्य यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आदर्श शिक्षक ,कवी भरत दौंडकर काव्य साधना पुरस्कार कवी दत्तात्रय जगताप, काव्यप्रतिभा पुरस्कार सचिन कांबळे पाली भाषा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पुरस्काराचे स्वरूप शाल, पुष्पगुच्छ , मानपत्र, स्मृतिचिन्ह, ग्रंथ देवून सन्मानित करण्यात येणार आहे. संयोजन समितीचे सदस्य राम सर्वगोड ,राजेंद्र वाघ, मानसी चिटणीस, निषीम भारती, जयश्री श्रीखंडे, प्रतिभा काळे, सविता इंगळे व इतर उपस्थित राहणार आहेत .पुरस्कार वितरण सोहळ्याचे स्थळ यशवंतराव चव्हाण ट्रेनिंग सेंटर आदर्श गाव हिवरे बाजार तालुका जिल्हा अहिल्यानगर येथे संपन्न होत आहे.