Baramati News l बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सोमनाथ भिले, उपाध्यक्षपदी राजेश वाघ तर सचिवपदी चिंतामणी क्षिरसागर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम---
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सोमनाथ भिले, उपाध्यक्षपदी राजेश वाघ, सचिवपदी चिंतामणी क्षीरसागर तर कार्याध्यक्षपदी युवराज खोमणे तर पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या अध्यक्षपदी महेश जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 
             बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाची वार्षिक सभा होळ-आठ फाटा येथे गणेश रेसिडेंशी येथे पार पडली. अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार जयराम सुपेकर होते. यावेळी सुपे पोलीस ठाण्याचे सपोनि. मनोज नवसरे, पो.ह. तुषार जैनक, माजी अध्यक्ष मनोहर तावरे, अशोक वेदपाठक, दत्ता माळशिकारे, राजेश वाघ, ॲड. गणेश आळंदीकर, कल्याण पाचांगणे, संतोष शेंडकर, महेश जगताप, राजेश वाघ, विजय मोरे, विजय गोलांडे, विनोद पवार, युवराज खोमणे, दीपक जाधव, हेमंत गडकरी, सचिन पवार, गजानन हगवणे, सोमनाथ लोणकर, संतोष भोसले, सुनील जाधव, सुशील अडागळे आदी पत्रकार उपस्थित होते. 
          मागील सभेचे इतिवृत्त सचिव चिंतामणी क्षीरसागर यांनी वाचून दाखवले. यावेळी नवीन सदस्य करून घेणे, पत्रकारांसाठी कल्याणनिधीची तरतूद करणे. पत्रकार संघासाठी पत्रकार भवनाची उभारणी करणेबाबत चर्चा झाली. अध्यक्षपदासाठी सोमनाथ भिले, राजेश वाघ, सुनील जाधव यांनी अध्यक्षपदाची मागणी केली. यावर सविस्तर चर्चा होऊन अध्यक्षपदी दैनिक सकाळ चे सोमनाथ भिले, उपाध्यक्षपदी निरा-बारामती साप्ताहिक चे राजेश वाघ, कार्याध्यक्ष दै. पुढारीचे युवराज खोमणे, सचिव सकाळचे चिंतामणी क्षीरसागर, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या अध्यक्षपदी दै. लोकमतचे महेश जगताप, खजिनदार दै. नवराष्ट्र चे सुनील जाधव, मार्गदर्शक जयराम सुपेकर, अशोक वेदपठाक, दत्ता माळशिकरे, ॲड.गणेश आळंदीकर, संतोष शेंडकर यांची निवड करण्यात आली.
To Top