Baramati News l सुप्यात वनप्रभोधनी संस्थेकडुन प्रशिक्षण कार्यक्रम

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दीपक जाधव 
महाराष्ट्रातील वनप्रभोधनी वनप्रशिक्षण संस्थेकडुन शहापुर येथील नवप्रशिक्षित वनरक्षक यांना मार्गदर्शन करण्यात आले. 
       यावेळी पुणे येथील उपवनसंरक्षक वनअधिकारी तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मयुरेश्वर अभयारण्य व परिसरातील असणाऱ्या वन्यजीव आणि गवत प्रजाती बाबत माहिती देवुन नवप्रशिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले.
          या कार्यक्रमाप्रसंगी पुणे उपवनसंरक्षक वनअधिकारी तुषार चव्हाण,  विभागीय वनअधिकारी स्नेहल पाटील, सहायक वनसंरक्षक किशोर येळे, सहायक वनसंरक्षक वन्यजीव पुणे येथील जयश्री पवार, सुपे मयुरेश्वर अभयारण्य येथील वनपरिक्षेत्र अधिकारी शितल फुंदे व क्षेत्रिय कर्मचारी आदी उपस्थित होते. 
       गेल्या वर्षापासुन जालना, पाल, चंद्रपुर, कुंडल आदी ठिकाणाहुन नवप्रशिक्षक सुपे येथील मयुरेश्वर अभयारण्य आले आहे. त्यांना विविध मान्यवरांकडुन मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी शितल फुंदे यांनी दिली. 
          ...................................
To Top