Bhor News l भोर-शिंदेवाडी रस्त्यावरील मोऱ्यांचे खड्डे ठरतायत जीवघेणे : पंधरा दिवसात तीन जण खड्ड्यात पडून गंभीर जखमी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
महाड-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील भोर - शिंदेवाडी रस्त्यावरील मोऱ्यांसाठी काढलेले चार ते पाच ठिकाणचे मोठमोठे खड्डे वाहनचालकांना दिसत नाहीत. परिणामी वाहनचालक खड्ड्यात पडून जखमी होण्याचे प्रकार घडत आहेत.पंधरा दिवसात उत्रोलीतील एक तर येवली ता.भोर येथील दोन जण गंभीर जखमी झाल्याचे घटना घडली आहे.
       शिंदेवाडी ता.खंडाळा येथून भोर मार्गे महाड-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे.या रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असून शिंदेवाडी पासून भोर ते शिंदेवाडी या १० किलोमीटर अंतरावर जवळजवळ पाच ते सहा ठिकाणी मोऱ्या बांधण्यासाठी संबंधित ठेकेदाराकडून रस्ता सहा फूट खोल तर दहा फूट रुंद असे खड्डे खोदून ठेवले आहेत.या रस्त्यावरून रोजगारासाठी शिरवळकडे जाणाऱ्या वाहन चालकांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर असल्याने वाहनचालकांना रस्ता खोदलेल्याचा अंदाज येत नाही. परिणामी वाहन चालकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. तर रस्ता खोदलेल्या ठिकाणी दिशादर्शक फलकांवर रस्त्याचे काम चालू आहे असे लिहिलेले नसल्याने वाहन चालकांना समोर रस्ता खोदलेला आहे हे समजून येत नाही.दुचाकी वाहनचालकांना या खोदलेल्या रस्त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत असून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या खड्डेमय रस्त्यामुळे उत्रोली येथील एक जणाच्या वरून गाडी सहित खड्ड्यात पडल्यामुळे बरकड्या मोडल्या आहेत तर येवली येथील दोन तरुण मोठ्या प्रमाणावर गंभीर जखमी झाले आहेत.संबंधित ठेकेदाराने अपघातग्रस्त तरुणांना भरपाई द्यावी अशी मागणी वाहनचालकाकडून होत आहे.रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावले तर अपघात होणार नाही असे वाहन चालकांकडून बोलले जात आहे.
--------------------------
शिंदेवाडी रहदारीचा रस्ता 
 भोर - शिंदेवाडी रस्त्यावरून दररोज शेकडो वाहनचालक भोर शहर तसेच ग्रामीण भागातून रोजगारासाठी विंग,शिंदेवाडी,सारोळा येथे जात असतात.हा रस्ता वाहतुकीसाठी महत्त्वाचा असल्याने अवजड वाहने ही या रस्त्यावरून ये-जा करीत असतात. सध्या या रहदारीच्या रस्त्यावर ठिकठिकाणी छोट्या-मोठ्या मोऱ्या बांधण्यासाठी मोठमोठे खड्डे खोदून ठेवले आहेत.संथ गतीने चाललेल्या रहदारीच्या रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करावे अशी मागणी वाहनचालकांकडून जोर धरू लागले आहे.
Tags
To Top