सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : दीपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे पोलिस स्टेशनंतर्गत जबरी जोरी अणि घरफोडी करुन चोरीला गेलेला ४ लाख ८८ हजार ९५४ किमतीचा मुद्देमाल फिर्यादीस परत करण्यात आल्याची माहिती सिपे येथील प्रभारी सहाय्यक पोलिस निरिक्षक मनोजकुमार नवसरे यांनी दिली.
पुणे जिल्हा पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बारामतीचे अप्पर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार यांच्या हस्ते तसेच बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत सुपे पोलिस स्टेशनंतर्गत असणाऱ्या मोरगाव येथील चेतना राजेंद्र चव्हाण, काऱ्हाटी येथील अमोल मोहन दुर्गे, सुपे येथील दिपक अशोक नेवसे, देऊळगाव रसाळ येथील शिवाजी बापुराव साळुंखे आदी चार फिर्यादींना त्यांचा मुद्देमाल परत करण्यात आला आहे.
सुपे पोलिस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरिक्षक मनोजकुमार नवसरे, पोलिस उपनिरिक्षक जिनेश कोळी, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र मोहरकर, सहा. पोलीस उपनिरीक्षक जयंत ताकवणे, तसेच सुपा पोलीस स्टेशनचा सर्व पोलीस स्टाफ आदींनी कार्यक्रमाचे आयोजन करून जबरी चोरी आणि घरफोडी गुन्हयातील आरोपींकडुन जप्त करण्यात आलेले ४ तोळे ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीच्या १३ पटया व रोख रक्कम ५ हजार असा एकुण ४ लाख ८८ हजार ९५४ रूपये किमतीचा मुद्देमाल तक्रारदारांना परत करण्यात आला आहे. त्यामुळे सुपे पोलिस स्टेशमधील सर्वच अधिकारी व कर्मचारी वर्गाचे कौतुक करण्यात येत आहे.
...................................