Bhor News l मांढरदेवी यात्रेपूर्वी उर्वरित भोर-मांढरदेवी रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करा : अप्पर पोलिस अधिक्षक बिराजदार यांच्या सुचना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
राज्यातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले जागृत देवस्थान मांढरदेवी येथील श्री काळुबाई देवीची यात्रा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी रस्त्याची पाहणी केली. सद्या नवीन रस्त्याचे काम आंबाडखिंड घाटात सुरू आहे. रस्त्याचे उर्वरित काम यात्रेपर्यंत पूर्ण करुन भाविकांसाठी रस्ता खुला करण्याच्या सुचना बारामती अप्पर पोलिस अधिक्षक गणेश बिराजदार यांनी रस्त्याची पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या. 
    कापुरव्होळ - भोर - मांढरदेवी - सुरुर फाट्यापर्यंत रस्त्याचे सिमेंट काँक्रेटीकरणाचे काम सुरु आहे. आंबाडखिंड घाटापर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होत आले आहे.मात्र घाटातील काम अर्धवट अवस्थेत आहे त्याचा नाहक त्रास यात्रा काळात मांढरदेवी ला येणाऱ्या राज्यातील भावी भक्तांना होणार आहे. यात्रा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.यात्रा काळात भाविक भक्तांना देवीला ये जा करताना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये तसेच कोणताही अनुसुचित प्रकार घडू नये याची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने घ्यावी असेही सांगण्यात आले. मंगळवार  दि. १७ भोर-मांढरदेवी रस्त्याची पाहणी करताना बारामती अप्पर पोलिस अधिक्षक गणेश बिराजदार , प्रांतधिकारी डाँ. विकास खरात ,तहसिलदार राजेंद्र नजन ,सहाय्यक गटविकास अधिकारी उदय जाधव , पोलिस निरीक्षक आण्णा पवार,सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल चव्हाण,चंद्रशेखर जगताप,शाखा उपअभियंता राजेसाहेब आगळे,प्रकाश जाधवर,वाहतूक पोलिस हवालदार सुनिल चव्हाण,अभय बर्गे,अजय साळुंखे,धर्मेद्र खांडे,ठेकेदार सोमनाथ कदम ,प्रोजेक्टर मँनेजर शशिकांत दिवेदी उपस्थित होते.यावेळी यात्राकाळात भाविकांनी वाहने सावकाश चालवावित, प्रशासनाला सहकार्य करावेअसे आवाहन प्रांतधिकारी डॉ. विकास खरात यांनी केले. 
Tags
To Top