Bhor News l आंबाडे केंद्रात केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धा संपन्न

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
आंबाडे ता. भोर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व काळेश्वरी माध्यमिक विद्यालयाच्या मैदानात  यशवंतराव चव्हाण कला व क्रिडा महोत्सव अंतर्गत कला, क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. केंद्रप्रमुख प्रभावती कोठावळे,आंबाडे गावच्या सरपंच माधुरी खोपडे, उपसरपंच नीता उल्हाळकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक खोपडे, सदस्य मनोज खोपडे, पोपट खोपडे, प्रियांका खोपडे,मुख्याध्यापक संगीता तोडकर  यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व मैदानाचे पूजन करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.
         स्पर्धेवेळी  मुलांना खिलाडूवृत्तीची प्रतिज्ञा देण्यात आली. सांघिक क्रिडा प्रकारात अट्यापाटया या पारंपरिक खेळाचा यामध्ये प्रथमच समावेश करण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबाडे यांनी वैयक्तिक व सांघिक कला,क्रिडा प्रकारात विशेष नैपुण्य यश मिळवले.केंद्रातील गोकवडी, वरोडी खुर्द, पाले, बालवडी या शाळातील विद्यार्थ्यांनी देखील प्रावीण्य मिळवले.नेरे, निळकंठ, म्हस्के किंद्रेवस्ती, कोळेवाडी, वरोडी बु. शेरताटी,वरोडी डाय,उदयखानवाडी,या शाळांनी देखील सहभाग नोंदवून यश संपादन केले. विजेत्या संघास व खेळाडूस ट्रॉफी,मेडल व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.सर्व विजेत्यांचे केंद्रप्रमुख प्रभावती कोठावळे यांनी अभिनंदन केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी राजू कारभळ, शरद पवार, बापू जेधे,संजय पवार ,अमर क्षीरसागर, आनंदा सावले, खंडू घोलप,संपत रांजणे,तुळशीराम वाघमारे, संदीप घाडगे,रविंद्र थोपटे, हरिप्रसाद सवणे, विजय धालपे,भीमराव शिंदे,अनिल महांगरे, महादेव बदक, भारती गरुड, उषा गोरड,माधुरी खपाटे,रत्नमाला घोलप,अंजना कोंढाळकर , उज्वला भारती, मोहिनी गायकवाड, छाया बढे, शोभा नेवसे, मंगल घोलप,माधुरी घाटे, रुपाली देशमाने, पूनम वेदपाठक, रुपाली कोळी या शिक्षकांनी स्पर्धेचे पंच म्हणून व स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले. स्पर्धा पाहण्यासाठी केंद्रातील पालक, विद्यार्थी, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

To Top