सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
कात्रज : प्रतिनिधी
पोलीस भरतीच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एका २३ वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (आंबेगाव पोलीस ठाणे) फिर्याद दिली आहे.
पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित तरुणी आणि आरोपीची चार वर्षांपूर्वी ओळख झाली होती. त्याने तरुणीला पोलीस दलात भरती करण्याचे आमिष दाखविले होते. पोलीस भरतीच्या आमिषाने त्याने तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केला. पोलीस भरतीबाबत विचारणा केल्याने त्याने त्यानंतर त्याने तरुणीला जिवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केली. आरोपीच्या त्रासामुळे घाबरलेल्या तरुणीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रियांका गोरे तपास करत आहेत.