सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
परप्रांतीय महिलेला हॉटेलवर कामाचे आमिष दाखवून तिला पत्र्याच्या खोलीतआठ ते नऊ दिवस डांबून ठेऊन जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार बारामती तालुक्यातील पणदरे येथून समोर आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा व माळेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा तात्काळ शोध घेऊन बेड्या ठोकल्या आहेत. तर पत्राच्या खोलीत नऊ दिवस डांबून ठेवलेल्या महिलेची सुटका करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. पोपट धनसिंग खामगळ (वय २५), रा. खामगळवाडी, ता. बारामती, जि. पुणे) असे लैंगिक अत्याचार करणाऱ्या हॉटेल व्यावसायिक आरोपीचे नाव आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार धक्कादायक बाब म्हणजे आरोपीवर यापूर्वी देखील बारामती शहर पोलीस स्टेशन व माळेगाव पोलीस ठाण्यात जबरदस्तीने महिले सोबत शारीरीक संबंध करून लैगिक अत्याचार केल्याचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. परप्रांतीय महिलेला खोलीत डांबून ठेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली.
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी तात्काळ पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, यांच्याशी संपर्क केला. स्थानिक गुन्हे शाखा व माळेगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई केली.