Phaltan Breaking l एकाच वाहनाचे दोनदा वजन करून साखरवाडी कारखान्याची फसवणूक : कारखान्याच्या दोन चिटबॉयसह दहा जणांना अटक, एका महिलेचा समावेश

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
साखरवाडी : प्रतिनिधी
स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता चिटबॉय, ऊस तोडणी कंत्राटदार, ट्रॅक्टर चालक व श्री दत्त इंडिया कारखान्याचा शेतकरीकोड असणाऱ्या व स्वतःच तोडणी कंत्राटदार असणाऱ्या शेतकऱ्यांना हाताशी धरून एकाच वाहनाचे दोनदा वजन करून श्री दत्त इंडिया साखर कारखान्याची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी कारखान्याच्या दोन चिटबॉय व एका महिलेसहित एकूण अकरा जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यापैकी दहा जणांना फलटण ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पोलिसांनी अटक केली आहे.        

संशयतांमध्ये सचिन नबाजी कोकरे (वय ३२) राहुल म्हाळसाकांत कोकरे (वय ३४) चालक जितेंद्र चंद्रकांत भिसे (वय २७) भाऊसो तात्याबा कोकरे (वय ३५)  पांडुरंग विश्वनाथ सुतार (वय ३५) सुरज अशोक धायगुडे (वय २४ वर्षे) सर्व रा अंदोरी ता खंडाळा, ज्ञानेश्वर महादेव होळकर (वय ३४)  सचिन महादेव होळकर (वय ३८)  सर्व रा रुई ता खंडाळा व कारखान्याचे चिटबॉय दत्तात्रय भिवा भुजबळ (वय ५२) रा पिंपरे बु ता खंडाळा व सुनील संपत पवार (वय ५२)रा शेडगेवाडी ता खंडाळा यांना अटक झाली असून अनिता सचिन होळकर (रा रुई ता खंडाळा) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे.
   याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्थानकातून मिळालेली अधिक माहिती अशी,
साखरवाडी कारखान्यामध्ये शेतकऱ्याचा ऊस फडातून तुटून तो कारखान्यात खाली होईपर्यंत शेतक-याला पावती देण्यापर्यंतच्या कामकाजासाठी ऑनलाईन सॉफ्टवेअरने होत असते त्याकरीता कारखान्याने ऊसतोडणी वाहतुक कंत्राटदारांना 'RFID कोड' व शेतक-यांना 'शेतकरीकोड' दिलेले आहेत.
  संशयित सुरज धायगुडे याने कारखान्याचे चिटबॉय, ट्रॅक्टर वरील वाहन चालक  कारखान्याचा शेतकरी कोड असणारे शेतकरी यांच्याशी संगणमत करून   कारखान्यात दि ४ डिसेंबर ते  १४ डिसेंबर दरम्यान रात्रीच्या वेळी तीन ट्रॅक्टर नंबर एम ११ १५५५,एम एच ११ बी ए १५६१ व एम एच ११ सी ए २५१४ मधून मूळ शेतकऱ्याचा तोडून आणलेला उसाचे कारखान्याच्या वजन काट्यावर वजन करून तो ऊस गव्हाणी मध्ये खाली न करता परत ऊस वजनाच्या रांगेमध्ये ट्रॅक्टर उभा करून ट्रॅक्टरला असणारा कारखान्याचा 'आर एफ आय डी' कोड बदलून त्याच्यावरील चालक बदलून त्याच ट्रॅक्टरचे शेतकरी कोड असणाऱ्या कंत्राटदारांच्या नावावरती पुन्हा एकदा वजन करून तो ऊस गव्हाणीत खाली करून एकदाच आणलेल्या उसाचे मूळ शेतकरी व तोडणी वाहतूकदार कंत्राटदार  शेतकरी यांच्या नावावरती वजन करून कारखान्याची १०२ टन ऊसाची व त्या पोटी मिळणारी तोडणी वाहतूक अशी एकूण ४ लाख २५ हजार रुपयांची  फसवणूक केल्याची फिर्याद कारखान्याचे केन मॅनेजर सदानंद पाटील यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिले आहे त्यानुसार पोलिसांनी एकूण दहा जणांना अटक केली असून त्यांच्याकडे या प्रकरणात अजून कोणाचा सहभाग आहे? याआधी संशयतांनी अशाप्रकारे कुठल्या कारखान्यावर फसवनुक आहे का व यामध्ये कारखान्यामधील कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे 
सदर फसवणुकीचा प्रकार संशयतांनी याआधी सुद्धा इतर कारखान्यावर केला आहे का? याचा सुद्धा तपास पोलीस करीत आहेत. 
To Top