भोर l नाझरे येथे भोर तालुका निवड चाचणी कुस्ती स्पर्धा संपन्न

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
पुणे (कोंढवा) येथे होणाऱ्या पुणे जिल्हा तालीम कुस्तीगीर संघाच्या निवड चाचणी कुस्ती स्पर्धेसाठी भोर तालुका तालीम कुस्तीगीर संघाची निवड चाचणी कुस्ती स्पर्धा नाझरे ता.भोर येथे संपन्न झाली. निवड चाचणी स्पर्धेत १५३ कुस्तीगीर सहभागी झाले होते.
   या स्पर्धेचे आयोजन जेष्ठ नेते अनंतरावजी थोपटे यांच्या वतीने भोर तालुका तालीम कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. मोहन खोपडे, ग्रामस्थ मंडळ नाझरे यांनी केले होते.स्पर्धा बालगट, वरिष्ठ गट ( गादी, माती विभाग ) पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस समारंभ माजी मंत्री शशिकांत शिंदे, भोर-राजगड- मुळशीचे माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते झाले.यावेळी तालुकाध्यक्ष पै.मोहन खोपडे यांची भारतीय शैली कुस्ती महासंघ महाराष्ट्र राज्य सचिव  तर तालुका कार्याध्यक्ष पै.मदन खुटवड यांची पुणे जिल्हा तालीम कुस्तीगीर संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सन्मान केला गेला.विजेत्या कुस्तीगीरांना चषक, ट्रॅक सूट प्रशस्तीपत्रक उद्योजक  जितेंद्र खोपडे यांच्या वतीने देऊन सन्मानित केले गेले.सांघिक विजेते म्हणून चांदीची ढाल कै.पै.दत्ताबापु थोपटे यांच्या स्मरणार्थ पै.अनिल थोपटे यांच्या वतीने भोंगवली गावास मिळाली. पै.सुनील थोपटे, गणेश हिरगुडे, मोहन मानकर, विजय भालघरे, मधुकर कानडे, राजेंद्र सणस, दीपक बदक, पै.अमित म्हस्के, राजेंद्र वरे, माऊली खोपडे, सागर शेटे, विजय गोळे,बाबा लिम्हण, रामा गोळे उपस्थित होते.

To Top