Baramati News l इंदिरा गांधी तांत्रिक विद्यानिकेतन येथे हळदीकुंकू कार्यक्रमात महिला आरोग्याचा जागर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------ 
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी 
सोमेश्वरनगर ता. बारामती येथे इंदिरा गांधी तांत्रिक विद्यानिकेतन येथे महिलांचा हळदीकुंकू चा कार्यक्रम आयोजित केला होता यास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 
         यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. शमा केंजळे, adv. हेमलता जगदाळे, रागिनी कुलकर्णी, सुचिता साळवे, सौ.मेहता इत्यादी उपस्थित होत्या. 
डॉ.शमा केंजळे यांनी महिला आरोग्य विषयी माहिती देऊन एकत्र कुटुंब पद्धती कशी रुजवावी, मुला,मुलीं वरती कसे संस्कार करावेत या विषयी माहिती दिली.
Adv. हेमलता जगदाळे यांनी महिला विषयी काय कायदे आहेत,  महिलांनी कसे सक्षम झाले पाहिजे, महिलांचे काय अधिकार आहेत तसेच हुंडाबळी या कायद्याविषयी माहिती दिली. सुचिता साळवे यांनी तरुण मुलींनी दक्ष राहून आपले हितकारक निर्णय कसे घ्यावेत याविषयी मार्गदर्शन केले. संस्थेच्या संचालिका उज्वला लोखंडे यांनी प्रस्ताविकामध्ये संस्थेची उद्दिष्टे व वैशिष्ट्ये या विषयी माहिती देऊन संस्थेमध्ये चालू असलेल्या कोर्सची माहिती दिली. सारिका जगताप यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.सना बागवान यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुषमा देवकर यांच्या हस्ते हळद-कुंकू चा कार्यक्रम पार पाडण्यात आला, राणी काकडे यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत व आभार मानले. 
या कार्यक्रमास संस्थेचे सचिव नितीन कुलकर्णी यांचे मार्गदर्शन तसेच मामा पवार यांचे सहकार्य लाभले.
To Top