सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात महाडवरून भोरकडे येताना उंबर्डेवाडी ता.भोर नजीकच्या वळणावरून इको चारचाकी गाडी (एमएच १२ युजे ९९५७) सोमवार दि. २७ रोजी पहाटेच्या वेळी दीडशे फूट दरीत कोसळली. गाडीत एकूण नऊ जण होते. इतर नऊ जण जखमी असून त्यातील दोन जण गंभीर जखमी आहेत.
अपघातात एकाचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी अवस्थेत असून जखमींना भोर येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. स्थानिक, सह्याद्री सर्च रेस्क्यू फोर्स भोर तसेच भोर पोलीस यांना अपघात झाल्याचे समजताच तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृत्यू झालेला इसम तसेच जखमींना दरीतून बाहेर काढण्यात आले. जखमींमध्ये दोन जण गंभीर असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.