Velhe Breaking l मिनल कांबळे l किल्ले राजगडावरील तटबंदीचा दगड डोक्यात पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वेल्हे : मिनल कांबळे
किल्ले राजगडावर तटबंदीचा दगड डोक्यात पडून युवकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती वेल्हे पोलिसांनी दिली. 
         याबाबतची खबर चैतन्य सर्जेराव आवटे यांनी वेल्हे पोलिसांना दिली. याबाबत पोलिसांनी सांगितले की 26 जानेवारी च्या दिवशी पुण्यातील ग्रुप राजगडावर फिरायला आलेला होता किल्ला पाहून झाल्यावर खाली उतरत असताना पाली दरवाजाजवळ बुरुजाचा दगड कोसळून युवकाच्या डोक्यात पडला. दगड पडल्यामुळे त्याच्या कानातून रक्त येत होते त्याला त्याच्या सहकाऱ्यांनी उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय वेल्हे येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी तपासल्यानंतर मृत घोषित केल्याचे केले, या मृत युवकाचे नाव 
अनिल विठ्ठल आवटे (वय 17 वर्षे) असून  सध्या तो  टमरीन पार्क महादेव मंदिराजवळ धायरी पुणे येथे राहत असून मूळगाव रा. खाद गाव ता. सेलू जि. परभणी असे आहे.अनिल विठ्ठल आवटे हा पोलीस भरतीची तयारी करीत होता यासाठी तो आपल्या मामाकडे धायरी येथे राहत होता. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानदीप धिवार करीत आहेत
To Top