सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भिगवण : संतोष माने
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर डाळज क्रमांक दोन जवळ उताराच्या ठिकाणी उसाचा ट्रेलर पलटी झाल्याने पूर्ण वाहतूक ठप्प झाली होती.
वास्तविक पाहता ट्रेलर मधील सर्व ऊस महामार्गावर पडल्याने वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे सर्विस रोड अर्थात सेवा रस्ता या मार्गे सोलापूर बाजू कडून येणारी वाहने वळविण्यात आली. या अपघातात कुणालाही दुखापत झालेली नाही. मात्र ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक कोणत्या पद्धतीने वाहन चालवितात हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे. आम्ही अपघात स्थळी पाहणी केली असता संबंधित चालकाने सांगितले की, टायर फुटल्याने हा अपघात झाला आहे. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मात्र पाहणे दरम्यान एक गोष्ट आढळून आली, ट्रेलर मधील सर्व ऊस महामार्गावर पडला होता. परंतु ट्रेलर व ट्रॅक्टर व्यवस्थित रित्या महामार्गाच्या कडेला असणाऱ्या खड्ड्यामध्ये जाऊन व्यवस्थित उभा होता. त्यामुळे अपघाताचे नक्की कारण काय हे मात्र सांगता येत नाही. एरवी तत्परता दाखवणारे राष्ट्रीय महामार्ग अभिकरण चे पेट्रोलिंग करणारे कर्मचारी अर्धा तास उलटून सुद्धा घटनास्थळी आली नव्हते. ट्रॅक्टरच्या पाठीमागे असणारी वाहने अडकून पडली होती. त्यामुळे वेगावर नाही नियंत्रण.... तर अपघाताला मिळेल आमंत्रण... नक्की उसाचा ट्रेलर टायर फुटल्याने किंवा कशाप्रकारे पलटी झाला याबाबत मात्र काही सांगता येत नाही. उसाचा भरलेला ट्रॅक्टर काळेवाडी येथून बारामती ऍग्रो या कारखान्याला जात असल्याची माहिती प्रत्यक्ष दर्शनी सांगितली.