पुरंदर l उपजिल्हाधिकारी रोहिणी आखाडे-फडतरे यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करणाऱ्या राज्यातील अधिकाऱ्यांना राज्य निवडणूक अधिकारी कार्यालय तर्फे पुरस्कार जाहीर करण्यात आले. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण उपजिल्हाधिकारी रोहिणी आखाडे- फडतरे यांना कुर्ला विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी मतदान साहित्य प्राप्त करून घेण्यासाठीच्या उत्कृष्ट नियोजन पुरस्कार प्रदान करण्यात आला.
     वरील राज्यस्तरीय पुरस्कार अतिरिक्त निवडणूक अधिकारी ,महाराष्ट्र राज्य डॉ.किरण कुलकर्णीआणि आयुक्त डॉ.चंद्रकांत पुंडलवार यांचे हस्ते राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पुण्यातील एमआयटी विद्यापीठात झालेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमात देण्यात आला.
      रोहिणी आखाडे यांचे पती शंकरराव फडतरे हे  हनुमंतवाडी बोपगाव (ता. पुरंदर )येथील रहिवासी असून ते प्रसिद्ध आर्किटेक्ट आहेत. त्यांचे दीर माऊली फडतरे हे बोपगाव येथील श्रीक्षेत्र कानिफनाथ गडावरील नवनाथ देवस्थान पंचायत कमिटी ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. 
     त्यांचे माहेर दौंड तालुक्यातील कासुर्डी हे आहे. वडील गुलाबराव विठोबा आखाडे हे पुणे महानगरपालिकेत अधिकारी पदावर कार्यरत होते. आई सुमन गुलाबराव आखाडे या शिक्षिका आहेत. भाऊ राहुल आखाडे हे मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. बहीण स्वाती राजेश जगदाळे या रोबोटिक्स इन्स्टिट्यूटच्या संस्थापक आहेत. 
    रोहिणी आखाडे -फडतरे व शंकराव फडतरे यांचे चिरंजीव आयुष्य फडतरे हे अमेरिकेत एमएसचे उच्च शिक्षण घेत असून कन्या आश्लेषा फडतरे माध्यमिक शिक्षण पूर्ण करत आहे. 
     रोहिणी आखाडे फडतरे यांना सन २०११ जनगणनेच्या उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रपती पदक प्राप्त झाले आहे. तसेच २०१६ मध्ये उत्कृष्ट तहसीलदार म्हणून सुद्धा शासनाने त्यांचा गौरव केला आहे, अशी माहिती नवनाथ देवस्थान पंचायत कमिटीचे उपाध्यक्ष दिपक फडतरे यांनी दिली.
   
To Top