Breaking news l वडिलांची बंदुक डोक्याला लावली आणि गोळी झाडली : आठवीतील मुलाची आत्महत्या

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
माढा : प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. माढ्यातील आढेगावमध्ये 8 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या 14 वर्षीय मुलाने आपल्या वडिलांच्या बंदुकीने डोक्यात गोळी झाडून आत्महत्याकेल्याची घटना घडली आहे.
           श्रीधर गणेश नष्टे असं आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. मुलाचे वडील गणेश नष्टे हे सिमा सुरक्षा दलात कार्यरत आहेत. बंदुकीचे लायसन जम्मू काश्मीरची असून वडिलांची घरातील बंदुक घेऊन घरातील खुर्चीवर बसून डोक्यात गोळी झाडून श्रीधरने आत्महत्या केली आहे. टेभुर्णी पोलिस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, खेळता खेळता ही दुर्घटना घडली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
To Top