सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : संतोष म्हस्के
अध्यात्मिक ज्ञानमंत्र वारकरी शिक्षण संस्था आपटी ता.भोर येथील चतुर्थ वर्धापन दिन, दिनदर्शिका प्रकाशन सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्मारक (शिवालय) लोकार्पण सोहळा बुधवार दि.१ संपन्न झाला.
तालुक्यात पहिलेच शिवस्मारक साकारल्याने शिवप्रेमींनी कार्यक्रम प्रसंगी अलोट गर्दी केली होती.
शिवस्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याचे औचित्य साधून १० लाख निधीच्या सामाजिक सभागृहाचे उद्घाटन माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले.सकाळपासूनच कार्यक्रम स्थळी जननी देवीचा अभिषेक ,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती ग्राम प्रदक्षिणा मिरवणूक सोहळा, छत्रपतींच्या मूर्तीचे विधिवत पूजन,पुरस्कार वितरण व दिनदर्शिका प्रकाशन सोहळा, शाहीर पोवाडा कार्यक्रम शिवचरित्रकार कट्टर हिंदुत्ववादी ह.भ.प अनिल महाराज देवळेकर यांचे सुश्राव्य कीर्तन पार पडले.यावेळी श्रीक्षेत्र नारायणपूर सद्गुरु टेंभे स्वामी, भरतनाना शिरसागर,माजी आमदार संग्राम थोपटे, अण्णासाहेब पाटील महामंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील, राजपुरोहित स्वामी ,नामदेव महाराज किंद्रे, बाबा स्वामी ,दत्ता स्वामी, युवा कीर्तनकार राहुल महाराज पारठे ,आनंद स्वामी, विठ्ठल महाराज धोंडे, गोरक्षक प्रमुख मिलिंद एकबोटे ,पंडित मोडक, शिवशंकर स्वामी, गणेश महाराज डांगे ,अमोल महाराज सूळ, बाजार समिती माजी सभापती लक्ष्मण पारठे,आदींसह आपटी पंचक्रोशी तसेच भोर तालुक्यातील शिवप्रेमी ग्रामस्थ ,तरुण,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार ,गायक, वादक, कलाकार, शिवभक्त यांचे शिवालयासाठी आर्थिक व वस्तुरूपाने सहकार्य लाभले.