Kolhapur l मौत को छुके टक से वापस...! गाडीचे चाक खड्ड्यात गेले आणि..पांडू तात्या उठून बसले...!

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
कोल्हापूर : प्रतिनिधी
मुखात विठ्ठलाच्या नामस्मरणातून अखंड हरिनामाचा गजर करत असतानाच, हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यामुळे तो वैकुंठी गेलेला मृतदेह नातेवाईकांच्या अंत्यदर्शनासाठी घरी घेऊन येत असतानाच, वाटेतील रस्त्यांच्या खड्ड्यांमध्ये बसलेल्या धक्क्यांनी पुन्हा हालचाल करू लागला.
        नातेवाईकांनी पुन्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणीत पुन्हा हृदय सुरू झाल्याचा चमत्कार पाहायला मिळाला. घरी आणताना गाडी खड्ड्यात जाते आणि तात्यांच्या हालचाली सुरू झाल्या. कसबा बावडा येथील ६५ वर्षीय पांडुरंग रामा उलपे अर्थात पांडुरंग तात्या यांच्याबाबत घडली.
         तात्या गेल्याचा निरोप आल्यानंतर नातेवाईक घरी येऊ लागले. अंत्यसंस्काराची तयारीही झाली. दरम्यान, तात्यांचा मृतदेह घरी आणताना रस्त्यावरील खड्डय़ात अॅम्ब्युलन्सचे चाक गेले. या धक्क्याने तात्यांच्या शरीरात हालचाल सुरू झाली. मग तत्काळ अॅम्ब्युलन्स डी. वाय. पाटील हॉस्पिटलकडे वळवली. तिथे डॉक्टरांनी तात्यांचे हृदय सुरू असल्याचे स्पष्ट केले.
To Top