मुरुड-जंजिरा l बाबुराव गोळे l काशीद किनाऱ्यावर पुण्याच्या पर्यटकाचा बुडून मृत्यू

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मुरुड-जंजिरा : बाबुराव गोळे
काशीदच्या समुद्रकिनारी नशेत पोहण्यासाठी उतरलेल्या एकाचा बुडून मृत्यू झाला. पुणे येथून हा पर्यटक रोहा येथील नातेवाइकांकडे आला होता.
        नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने पर्यटक समुद्रकिनाऱ्यांवर आले आहेत. रायगड जिल्ह्यातील काशीद किनाऱ्यावरही मोठ्या संख्येने पर्यटक आले आहेत. अशातच जीवरक्षकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करताना पुणे येथून आलेला ग्रुपमधील प्रतीक सहस्त्रबुद्धे हा नशेत काशीद येथील समुद्रात पोहण्यासाठी उतरला होता. किनाऱ्यावरील जीवरक्षांनी त्याला बुडताना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, पाण्यात जास्तवेळ राहिल्याने त्याचा मृत्यू झाला. यावेळी आलेल्या पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन मुरूड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी केले.
To Top