सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
आजच्या तरुणाईने मोबाईल वेडे न होता शिवरायांचे विचार आचरणात आणावेत असे प्रतिपादन शिव व्याख्याते राहुल शिंदे यांनी केले.
सुपे (ता.बारामती) येथील जीवन साधना फाऊंडेशन संस्थेच्यावतीने प्राजक्ता विद्यालयाची प्रेरणा असलेल्या प्राजक्ता सुपेकर हिच्या ११ व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेल्या ''प्राजक्ता'' व्याख्यानमालेत ' छत्रपती शिवाजी महाराज आणि आजची तरुणाई ' या विषयावर पहिले पुष्प शिंदे यांनी गुंफले यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्याचे सरपंच तुषार हिरवे होते. तर प्रमुख पाहुणे सुपे पोलिस स्टेशनचे सहय्यक पोलिस निरिक्षक मनोजकुमार नवसरे होते. यावेळी पत्रकार दिनाच्या निमित्ताने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. तसेच उपस्थित पत्रकारांचा सत्कार येथील प्राजक्ता मतिमंद विद्यालय आणि सुपे पोलिस स्टेशनच्यावतीने करण्यात आला.
औरंगजेब म्हणाला की शिवाजीची चाल चलन दुध की तरह साफ और सुरज की तरह चमकदार आहे. त्यामुळे औरंगजेब स्वत: च्या मुलाला म्हणाला की शिवाजीच्या पावलावर पाऊल ठेवुन काम करावे लागेल. अशाप्रकारे औरंगजेब हा शत्रू असुनही शिवरायांचे कौतुक करीत होता. तसेच परदेशातही शिवरायांच्या शिवचरित्राचा बोध घेतला जातो. अशी अनेक उदाहरण देवुन शिंदे यांनी शिवरायाबद्दलच्या असणाऱ्या भावना उपस्थितांमध्ये जागृत केल्या. त्यामुळे आजच्या तरुणाईने शिवरायांचे विचार आत्मसात करण्याची आवश्यकता असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती पोपटराव पानसरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष सोमनाथ भिले, मनोहर तावरे, अशोक वेदपाठक, विजय मोरे, सचिन पवार, सुनिल जाधव, समीर बनकर, निलेश बनकर, बोरकरवाडीचे माजी उपसरपंच दत्तात्रय कदम, संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश चांदगुडे, सचिव डॉ. श्रीप्रसाद वाबळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक जयराम सुपेकर यांनी केले. सुत्रसंचालन हेमंत गडकरी यांनी केले. व्याख्यात्यांचा परिचय व्यवस्थापक अशोक बसाळे यांनी केला. तर मच्चिंद्र गिरमे यांनी आभार मानले.
---------------------------------------