Baramati News l 'सोमेश्वर'च्या संचालकपदी मिलिंद कांबळे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी होळ-मोरगाव गटातून मिलिंद बळवंत कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. 
             संचालक प्रवीण कांबळे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त पदी मिलिंद कांबळे यांची निवड करण्यात आली. आज सोमेश्वर कारखान्यावरील जिजाऊ सभागृहात ही निवड पार पडली. मिलिंद कांबळे यांचा रिक्त संचालक पदासाठी एकमेव अर्ज आल्याने बारामतीचे सहाय्यक निबंधक प्रमोद दुर्गुडे यांनी कांबळे यांच्या नावाची घोषणा केली. यावेळी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे, उपाध्यक्ष बाळासाहेब कामथे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
To Top