Baramati News l जिल्हा बँकेचे मा. संचालक शांताराम होळकर यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
होळ ता. बारामती येथील पुणे जिल्हा बँकेचे माजी संचालक तथा आनंद विद्यालय होळचे संस्थापक शांताराम उर्फ दादासाहेब आनंदराव होळकर यांचे वृद्धपकाळाने निधन झाले आहे. ते ८५ वर्षांचे होते. 
            होळकर यांनी २५ वर्षापेक्षा अधिक काळ होळ ग्रामपंचायत चे सरपंचपद भूषविले आहे. तसेच यशवंत सोसायटीची देखील त्यांनी स्थापना केली आहे. त्यांच्या पश्चयात तीन मुले, दोन मुली, सुना नातवंडे व जावई असा परिवार आहे. सोमेश्वर कारखान्याचे मा. उपाध्यक्ष व विद्यमान संचालक आंनदकुमार होळकर यांचे ते वडील होत.
To Top