सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : महेश जगताप
बारामती तालुक्यातील मुर्टी येथे सुसाट दुचाकी घसरून झालेल्या अपघातात साखरवाडी ता. फलटण येथील एका तरुणाचा मृत्यू झाला आहे तर दुचाकीवरील इतर दोन सहकारी गंभीररित्या जखमी झाले आहेत. ही घटना बारामती तालुक्यातील मुर्टी येथे दि. १५ रोजी चार वाजण्याच्या सुमारास घडली.
या अपघातात प्रतीक अंतू मोरे वय १६ रा. साखरवाडी या तरुणाचा मृत्यू झाला आहे तर त्याचे दोन सहकारी आदित्य राऊत व शिवम कोळे रा. साखरवाडी ता. फलटण जि सातारा हे गंभीररीत्या जखमी झाले आहेत.
प्रतीक साखरवाडी येथील विद्यालयात १० वीचे शिक्षण घेत होता. आज त्याच्या शाळेचा दहावीचा निरोप समारंभ होता सकाळी निरोप समारंभ आठ ते दहा दुचाकीवरून प्रतीकच्या वर्गातील अनेक मुले देवदर्शनासाठी गेली होती. जेजुरी त्यानंतर मोरगावचे दर्शन करुन तो मुर्टी मार्गे साखरवाडी येथे जात असताना मुर्टी येथील आश्रमशाळा येथे वळणावर दुचाकी घसरून अपघात झाला. यामध्ये प्रतिकच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला तर त्याचे दोन मित्र गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी बारामती येथे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस करत आहेत.