सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य पोलीस दलात भरती झालेल्या करंजेपुल ता. बारामती येथील मयूर सुनील गायकवाड याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
पाच वर्षापासून मयुर हा करंजेपूल येथीलच एका स्थानिक अभ्यासिकेत अभ्यास करून हे यश मिळवले आहे. मयूर गायकवाड यांचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बारामती तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषी गायकवाड, हरिष गायकवाड, निलेश गायकवाड, सागर गायकवाड, मंगेश गायकवाड, सुहास गायकवाड, रामराजे राजवडे, सूरज जाधव, नितीन साखरे, सागर वायळ, रणजीत गायकवाड,प्रणय गायकवाड,धीरज गायकवाड, मयूर गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.