सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्यात बांबू पिक घेण्यासाठी वातावरण पोषक आहे.बांबू पिकाची लागवड योग्य पद्धतीने केलेस बांबूचे पीक जोमात येते.बांबू एक हमखास मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळवून देणारे आहे असे मत मनरेगाचे अधिकारी साईराज प्रधान यांनी केले.
जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती कृषी विभाग यांच्या आयोजित कृषी मेळावा बांबू शेती कार्यशाळा व नैसर्गिक सेंद्रिय शेती या विषयावर पार पडला यावेळी टिटेघर ता.भोर प्रधान बोलत होते.कार्यशाळेत आदर्श शेतकरी गुलाबराव घुले यांनी भविष्य काळातील सेंद्रिय शेतीचे महत्व पटवून दिले.सेंद्रिय शेती भविष्यामध्ये आरोग्य जपण्यासाठी महत्वपूर्ण ठरनार आहे.सेंद्रिय शेती करण्याची पद्धत व त्याचे फायदे याची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना देण्यात आली.शेतकऱ्यांसाठी कृषी विभागातून दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या योजना याचीही माहिती मेळाव्यास उपस्थित शेतकऱ्यांना देण्यात आली.यावेळी सहाय्यक गट विकास अधिकारी उदय जाधव, ध्रुव प्रतिष्ठान अध्यक्ष राजीव केळकर,कृषी विभाग अधिकारी शिवराज पाटील ,विजय कोळी, दिपाली चांदगुडे, सरपंच शशिकला नवघणे, उपसरपंच शंकर सणस, टीटेघर व पंचक्रोशीतील शेतकरी बांधव मेळाव्यास उपस्थित होते.