सोमेश्वर रिपोर्टर टीम------
इंदापूर : संतोष माने
जिद्द, चिकाटी, धाडस व महत्त्वकांक्षा असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नसते. हेच दाखवून दिले आहे, इंदापूर तालुक्यातील डाळज क्रमांक 2 येथील धर्मराज भाऊसाहेब पानसरे याने.. नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये धर्मराज पानसरे यांची अन्न सुरक्षा अधिकारी ,( अन्न व औषध प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन) म्हणून निवड झाली आहे. धर्मराज भाऊसाहेब पानसरे हे सन 2022 सालापासून कल्याण येथे राज्यकर निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. त्यामध्ये त्यांची अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीनंतर सर्व स्तरातून स्वागत होत आहे. तसेच परिसरातील नागरिक निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार करीत आहेत. विशेष म्हणजे त्यांची मोठी बहीण पूजा भाऊसाहेब पानसरे या सध्या यवतमाळ येथे सहाय्यक वनरक्षक (वर्ग-1) या पदावर ती कार्यरत आहेत. त्यामुळे या दोन्ही भाऊ व बहीण यांनी गगन भरारी घेत यशाची पावले गाठली आहेत. वडील भाऊसाहेब पानसरे हे शेतकरी आहेत. परंतु मुलांना शिक्षण व मुलांची उच्च पदावर जाण्याची इर्षा, यासाठी त्यांनी नेहमीच पाठबळ दिले. अनेक गावातील लोक धर्मराज यांच्या सत्कारासाठी येत असताना भाऊसाहेब पानसरे यांच्या डोळ्यामध्ये मात्र आनंदाश्रू दिसत आहेत. आमचे प्रतिनिधी संतोष माने यांनी सुद्धा धर्मराज यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा "सोमेश्वर रिपोर्टर "तर्फे सत्कार केला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, जिद्द व चिकाटी असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. नेहमी सकारात्मक दृष्ट्या विचार करून आपली पावले पुढे सरसावली पाहिजेत.