सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
बारामती तालुक्यातील जनाई उपसा जलसिंचन योजनेच्या भुसंपदनाचे पैसे त्वरीत मिळावेत. तसेच या योजनेच्या बंदनलिका प्रकल्पाला परिसरातील सात गावातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. या योजनेचा बंदनलिका प्रकल्प राबविल्यास परिसरातील शेतकऱ्यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
सुपे येथील उपबाजार समितीच्या गणेश मंदिरात सात गावातील शेतकऱ्यांची रविवारी ( दि. १६ ) बैठक पार पडली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना यासंदर्भात निवेदन देण्यात येणार आहे. या योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना भुसंपानदाचे पैसे त्वरीत मिळावेत अशी मागणी या बैठकित करण्यात आली. तसेच या जनाई योजनेच्या शासन राबवित असलेल्या बंद नलिकेला शेतकऱ्यांनी यावेळी तीव्र विरोध केला. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे.
यावेळी सुपे, दंडवाडी अंतर्गत असणारी खोपवाडी, शेटेवाडी तसेच नारोळी, कोळोली, देऊळगाव रसाळ, काळखैरेवाडी आणि पानसरेवाडी आदी भाग पाण्यापासुन वंचित राहु शकतो. येथील शेतकऱ्यांनी सिना - माढा बंदनलिका प्रकल्पाला भेट दिलेली आहे. या प्रकल्पाची बंदनलिका योजना राबविल्याने शेतकऱ्यांची पाणी पुरेसे नसल्याने बिकट आवस्था झाली आहे. अशीच अवस्था सुपे परिसरातील शेतकऱ्यांची होवु शकते.
येथील परिसर हा कायमस्वरुपी दुष्काळी समजला जातो. जनाईचे पाणी आल्याने शेतकरीवर्गाकडे चर पैसे येवु लागले आहेत. त्यामुळे या योजनेच्या अधिकाऱ्यांनी या बाबत शेतकऱ्यांना भेटुन प्रथम माहिती द्यावी. अन्यथा मुख्य कालवा हा बंदनलिका ऐवजी अस्तरिकरण करण्यात यावा अशी मागणी या बैठकित झाली. त्यामुळे येथील ग्रामस्थांचा विरोध डावलुन बंदनलिकेचे काम सुरु केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
...............................