सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
वेळवंड-पांगारी ता.भोर खोऱ्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कायमच विशेष प्रयत्न केलेले आहेत.पुढील काळातही जनतेच्या समस्या जाणून घेऊन तत्परतेने त्या सोडवल्या जातील.जयतपाड- रांजणवाडी नदी पुलाचे काम मार्गी लागले आहे. अनेक वर्षांपासून नागरिकांची होणारी दळणवळणाची गैरसोय लवकरच थांबेल असे प्रतिपादन भोर - वेल्हा - मुळशीचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी शनिवार दि.१ केले.
वेळवंड खोऱ्यातील प्रजिमा ४४ ते जयतपाड (रांजणवाडी ) येथे नदीवरील पुलाचे बांधकामासाठी मंजूर झालेल्या १ कोटी ५० लक्ष रुपये विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी माजी आमदार थोपटे बोलत होते.यावेळी भाटघर धरण कृषी समिती अध्यक्ष विठ्ठल वरखडे,सचिव काळुराम मळेकर, गणेश कंक, माऊली दानवले,विठ्ठल गोरे, वसंत वरखडे ,भाऊ मळेकर ,संतोष मळेकर, दत्ता मोरे, उल्हास धुमाळ,प्रकाश जाधवर,सरपंच, उपसरपंच आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.थोपटे पुढे म्हणाले लवकरच नदी पुलाचे काम पूर्ण होईल.यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी नवीन पुल रस्ता सोईस्कर ठरेल.नागरिकांना दळणवळणासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते ते थांबणार आहे.तर अनेक बुजुर्ग व्यक्तींच्या रस्त्या बाबतच्या इच्छा पूर्ण होतील. सदरील पुलाचे काम मार्गी लावल्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त करीत मा.आमदार थोपटे यांचे आभार व्यक्त केले.