Daund Breaking l जन्मदात्या आईने झोपेतच दोन चिमुकल्यांचा गळा दाबला : पतीवर केले कोयत्याने वार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
दौंड : प्रतिनिधी
किरकोळ वादातून जन्मदात्या आईनेच दोन चिमुकल्यांचा बळी घेतला आहे. झोपेतच गळा दाबून केली मुलांची हत्या केली आहे. आरोपी महिलेकडून पतीवर देखील कोयत्याने वार केले आहेत. पतीवर उपचार सुरू आहेत. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे ही घटना घडली आहे. दौंड पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले आहे.  
          एका महिलेने आपल्या दोन चिमुकल्यांचा गळा दाबून हत्या केली आहे. यासोबतच या महिलेने आपल्या पतीवर देखील कोयत्याने वार केले आहेत. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली मधील शिंदे वस्ती या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली असून दौंड पोलिसांनी या आरोपी कोमल दुर्योधन मिंढे या 30 वर्षीय महिलेला अटक केली आहे. शंभू दुर्योधन मिढे वय ०१ वर्ष  आणि पियू दुर्योधन मिढे वय ०३ वर्ष अशी मयत मुलांची नावे असून या महिलेने तिचा पती दुर्योधन आबासाहेब मिढे वय 35 वर्ष याला देखील कोयत्याने मानेवर व हातावर वार करून जखमी केल आहे.पती-पत्नीच्या वादातून आणि सासरच्या जाचाला त्रासून कंटाळून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलण्याची माहिती मिळत आहे.
        आज पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली असून ही घटना समजताच दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार आणि कुरकुंभ चौकी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.
To Top