Khandala News l हे सरकार पाच वर्ष सत्तेत राहीले तर महाराष्ट्राचे भवितव्य धोक्यात येईल : आ. रोहीत पवार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणंद : निलेश काशिद 
लोणंद ता. खंडाळा येथील राज्यस्तरीय शरद कृषि प्रदर्शनास कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी भेट दिली. यावेळेस पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी बेधडक उत्तरे देत सरकारवर निशाना साधला.
         सध्या महाराष्ट्रात गाजत असलेल्या धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर उत्तर देताना रोहित पवार यांनी अख्खा महाराष्ट्र धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची अपेक्षा व्यक्त करत असल्याचे सांगत यापूर्वी आर आर आबा यांच्याकडून हिंदीत बोलताना थोडीशी चुक झालेली होती यावरून त्यांनी नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा दिल्याची आठवण करून दिली. तसेच अजित पवार, विलासराव देशमुख हे मुखमंत्री पदावर असतानाही त्यांनी नैतिकतेच्या मुद्यावरून राजीनामा दिल्याची आठवण करून दिली. नैतिकता दाखवण्यासाठी धाडस लागते, ते आजच्या नेत्यांकडे नसल्याचे सांगितले. 
         निवडणूक आयोगाकडून हायकोर्टाने ७६ लाख मतदार वाढल्याबाबतची माहीती मागविण्यात आलीय त्यावर मत व्यक्त करताना रोहित पवार यांनी काही मतदान केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज मागवून मतदान केंद्रांपर्यंत मतदानासाठी किती मतदार गेले व एकूण कीती मतदान झाले याची माहीती मागवणार असून ईव्हीएम प्रीफिक्स प्रोग्राम केला असण्याची शक्यता व्यक्त केली. ईव्हीएम बाबतच्या लोकांच्या शंकांचे निरसन झाले नाही तर त्यांचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल असे वक्तव्य केले. तर बीड मधील अनेक कामात अनियमितता असल्याचे सांगत सरकारी पातळीवरील चौकशीतून फारसे काही निष्पन्न होणार नाही. त्याची निष्कलंक व्यक्तीकडून ज्युडिशियल इन्क्वायरी होणे आवश्यक असल्याचे मत मांडले. 
           उद्यापासून राज्यातील काॅन्ट्रॅक्टर कामबंद आंदोलन करणार असल्याच्या पाश्र्वभूमीवर बोलताना रोहित पवार यांनी हे सरकार काॅन्ट्रॅक्टरांचे नव्वद हजार कोटी रूपये कसे देणार असा सवाल उपस्थित केला. 
 एमएसआयडीसी ,एमएसआरटीसी , आरोग्य विभाग यांच्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून ते निवडणुकीसाठी आधीच काॅन्ट्रॅक्टर कडून वसूल केले असल्याचे सांगत राज्य परिवहनच्या दोन हजार कोटींच्या काॅन्ट्रॅक्ट मधून २०० कोटी सत्ताधाऱ्यांनी आधीच काढून घेतले तर एमएसआयडीसीच्या काॅन्ट्रॅक्ट मधूनही अशाच प्रकारे पंधराशे कोटी वसूल करण्यात आले असल्याचा आरोप केला. यावेळेस लाडकी बहिण योजनेत नाही तर अनेक ठिकाणी सुमारे पन्नास ते साठ हजार कोटींचा मोठा भ्रष्टाचार आधीच्या सरकारकडून झाला असून त्यामुळेच राछ्य अडचणीत आले असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 

To Top