khandala News l महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पैलवानांसाठी की नेत्यांसाठी ? आ. रोहित पवार यांचा सवाल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : निलेश काशीद
नुकत्याच अहिल्यानगर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेबाबत बोलताना रोहित पवार यांनी ती स्पर्धा पैलवानांसाठी आयोजित केलेली की नेत्यांसाठी असा सवाल खडा सवाल कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केला. 
            लोणंद जि. सातारा येथे शरद कृषी महोत्सव येथे आमदार पवार यांनी भेट दिली त्यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, अहिल्यानगर येथे कुस्तीतील तज्ञ कमी आणि नेतेमंडळी जास्त असल्याचे सागितले. तसेच त्याठिकाणी माजी महाराष्ट्र केसरी यांचाही मानसन्मान ठेवला गेला नसल्याचे स्पष्ट केले. तिथे जे झाले ते योग्य वाटत नसल्याचे सांगत आगामी काळात महाराष्ट्र कुस्ती परिषद या सत्तर वर्ष कुस्तीसाठी काम करत असलेल्या संस्थेच्या माध्यमातून कर्जत जामखेड या ठिकाणी निपक्षपाती पणे खरी महाराष्ट्र केसरी स्पर्धा खेळविण्यात येईल असे स्पष्ट केले.
       पुढे बोलताना ते म्हणाले, लाडक्या बहीण योजनेमुळे ते सध्या निर्धास्त आहेत.  त्यांना कसले टेंशन नाही. पण लाडकी बहिण हुशार आहे. तिला आपल्या हिताचे काय आहे ते समजते , शेतकरी संकटात आहे. युवावर्गाला बेरोजगारी सतावतेय, सरकारचे शिक्षणाकडे साफ दुर्लक्ष असून राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळली असूनही सरकार आपल्याच धुंदीत असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. हे सरकार असेच पाच वर्ष कायम राहीले तर महाराष्ट्राचे भवितव्य धोक्यात येईल असा घणाघात त्यांनी सरकारवर बोलताना केला.
To Top