सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
निरा : विजय लकडे
वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूट, मांजरी येथील शास्त्रज्ञ डाॅ. क्रांती हनुमंतराव काकडे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ , पुणे येथून मायक्रोबायलोजी या विद्याशाखेमधून डाॅक्टर ऑफ फिलॉसॉफी ( PhD) प्रदान करण्यात आली.
"फोटोरहॅबडस स्पेसीज बेस्ड नोव्हेल फार्मूलेशन फॉर द सस्टेनेबल बायोकोंट्रोल ऑफ वाइट ग्रब पेस्ट इन्फेस्टिंग शुगरकेन" हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. या संशोधनाचा त्यांनी तीन शोधनिबंध प्रकाशित केलेले आहे. या संशोधनात 'हुमनी कीड' नियंत्रणाकरीता जैविक तंत्रज्ञान विकसित केले असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
क्रांती काकडे या निंबुत (बारामती ) या गावच्या कन्या आहेत. तसेच त्या पुरंदर तालुक्यातील गुळूंचे गावच्या सुनबाई आहेत. त्यांचे शालेय शिक्षण निंबुत, सोमेश्वर महाविद्यालय, शारदानगर, पुणे येथे झाले आहे. त्यांच्या या संशोधनाकरीता त्यांना डाॅ. राजश्री पटवर्धन व डाॅ. गिरीश पठाडे यांनी मार्गदर्शन केले.